ग्रामीण

गिफ्ट व्हाऊचर चे आमिष दाखवून तरुणास दोन लाख सत्तर हजाराचा गंडा

आरोपी विरोधात नवीन कामठी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

कामठी ता प्र 5:-, नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील हाजी नगर बीबी कॉलनी कळमना रोड येरखेडा येथिल तरुणाला विशेष आकर्षित गिफ्ट व्हाऊचर चे आमिष दाखवून दोन लाख सत्तर हजार रुपयांनी लुबाडण्याची घटना घडली असून आरोपी विरोधात नवीन कामठी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्तकिम बारी वय 29 राहणार हाजी नगर बीबी कॉलनी कळमना रोड येरखेडा यांना आरोपी राजू महंतो याने दिनांक 21 जुलै सकाळी 9 वाजेपासून तर 24 जुलैपर्यंत मोबाईल क्रमांक 7620649302 फोन करून मस्ताकिंम बारी यांना आपल्याला विशेष आकर्षित गिफ्ट व्हावचर लागल्याचे सागुण त्याकरीता आपल्याला ऑनलाईन बँक मार्फत फी जमा करण्यास सांगितले

तक्रारकर्ता मस्ताकिंम बारी यांनी आरोपी राजू महतो यांना आपला बँक अकाउंट सर्व माहिती दिल्याने आरोपी राजू महतो याने मुस्ताकिम बारी यांच्या खात्यातून 2 लाख70 हजार रुपये गहाळ केले

मुस्ताकीम बारी यांनी आरोपी राजू महंतो यांना गिफ्ट वचेर बद्दल मागणी केली असता त्यांनी गिफ्ट व्हाऊचर व लुबाडणूक केलेले पैसे परत देण्यास नकार दिल्यामुळे मुस्ताकिम बारी यांना आपली लुबाडणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नवीन कामठी पोलिस स्टेशन गाठून 2 ऑगस्टला आरोपी राजू बारी राजू महतो विरोधात तक्रार केली पोलिसांनी आरोपी राजू महतोविरोधात कलम 420 भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!