
नागपूर
नागपूरात मैदानांमध्ये वाहने पार्क करणा-यांवर होणार कारवाई
नागपूर (प्रतिनिधी) : शहरामध्ये अनेक मोकळी मैदाने आहेत. अनेक भागात अशा मैदानांमध्ये वाहने उभी करून ठेवली जातात. पावसाळ्यात ही वाहने उभी राहत असल्याने वाहनांच्या चाकांमुळे मैदानात खड्डे तयार झालेली आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले राहत असल्याने डासोत्पत्तीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मैदानांमध्ये वाहने उभी करणा-यांवरही कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांद्वारे घेण्यात आलेला आहे.