
संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतील गुणवंतांचे कौतुक
हिंगणा( प्रतिनिधि): हिंगणा तालुक्यातील श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व स्वर्गीय देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया च्या एच एस सी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक महेश बंग व संचालिका अरुणा बंग यांनी पुष्प देऊन व मिठाई देत कौतुक केले.
स्व. देवकीबाई बंग कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयातून वाणिज्य शाखेत कु. दिव्यांशी बारई 92.33 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला, कु. ऋत्विका आजनकर 85.50 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक कु. रुचिका राऊत 84.50 टक्के गुण घेऊन तृतीय स्थान प्राप्त केले. विज्ञान विभागातून कु.वैष्णवी गांजुडे 91.17 टक्के गुण घेऊन प्रथम. चि. तेजस धर्मे 87.67 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक व कु. मनिषा पवार 83.83 टक्के गुण घेऊन तृतीय आली
तर नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत कु. आकांक्षा मेश्राम 85.33 टक्के गुण मिळवून प्रथम स्थान मिळवले पवन घोडे 85.16 टक्के गुणांसह द्वितीय स्थान तर गौरव बोंद्रे 82.83 टक्के गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले. कला शाखेत कु. अबोली फाटके 80.33 टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळविले कु अंजली उईके 78.16 टक्के गुण घेऊन द्वितीय तर कु. प्रतिक्षा खेर्डेकर 77.16 टक्के गुण प्राप्त करून तृतीय स्थान मिळवले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेद्वारे कौतुक करून भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत मोहिते, स्व. देवकी बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, प्रा. सुरेश गुडधे, प्रा. निशिकांत पोकळे, प्रा. कैलास पांडे प्रा. विनोद वानखेडे, प्रा. श्वेता तुपेकर प्रा.आराधना घरडे यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.