
वर्धेत आज 4 ऑगस्ट पासून लॉकडाउनचे निर्बंध शिथिल
दुकाने 8 वाजेपर्यंत राहणार सुरू
शनिवारी 3 वाजेपर्यंतच सुरू
अत्यावश्यक सेवा वगळता रविवारी लॉकडाऊन
चित्रपट गृहे नाट्यगृहे बंद
वर्धा, दि 3 ऑगस्ट :- राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबतची नवी नियमावली काल जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले असून सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील, तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील.
रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.
व्यायामाचे उद्येशाने सर्व सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणे, बगिचे, मॉर्निंग व ईव्हीनिंग वॉक, सायकलिंगकरिता पूर्णपणे सुरु राहतील. तसेच सर्व कृषी उपक्रम,नागरी कामे,औदयोगिक उपक्रम मालाची वाहतुक पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.
50 टक्के क्षमतेने सुरू
व्यायामशाळा/योगकेंद्रे, हेअर कटींग सलुन ,ब्युटी पार्लर, क्षमतेच्या 50 टक्के (वातानुकुलित यंत्राच्या वापरास मनाई) रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार सर्व कोविङ-19 विषयक नियमांचे पालन करुन सुरु राहतील. तथापी दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधा व घरपोच सुविधा सुरु असेल. तसेच शनिवार व रविवार डाईन इन साठी पूर्णपणे बंद राहील, केवळ पार्सल सुविधा व घरपोच सुविधा सुरु असेल.
पूर्णपणे बंद
सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे, सर्व चित्रपटगृहे,नाटयगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच मॉलच्या आतमधील भाग) पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शाळा व महविद्यालये यांना राज्य शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील.
वाढदिवस साजरा करणे, राजकिय, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूका, निवडणूक प्रचार,रॅली,निषेध मोर्चे, यावरील निर्बंध पूर्ववत राहतील.
नागरीकांच्या हालचालींवर तसेच रात्री बाहेर पडण्यास रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत निर्बंध राहतील.
निर्बंध शिथिल करतांना नागरिकांनी कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. मास्क लावणे, सामाजीक अंतर राखणे, दुकानाबाहेर हँडवॉश, साबण, सनिटायझर ठेवणे आवश्यक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच यापुर्वी निर्गमीत आदेशा प्रमाणे दंड आकारण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे.