
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रामटेक तालुक्यातील 62 प्रकरणांचा निपटारा
लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसी समझौत्याने निपटारा करावा-
दिवाणी न्यायाधीश व्ही.पी. धुर्वे
रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ, रामटेक यांचे संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय रामटेक येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 62 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या राष्ट्रीय लोक अदालतीचे रामटेक तालुका विधी सेवासमितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश व्ही.पी. धुर्वे तसेच ए. ए. कुलकर्णी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला तालुका वकील संघाचे अध्यक्ष मुकुंदराव नवरे,सचिव महेंद्र येरपुडे,सह इतर सदस्य हजर होते .
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश कु व्हि.पी धुर्वे यांनी आपल्या भाषणात कोरोनाच्या परिस्थितीमुळे मिळालेल्या शिकवणीतुन वाद वाढविण्यात अर्थ नाही, त्यामुळे लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसी समझौत्याने निपटारा करावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाची प्रस्तावना व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक च्या सहाय्यक अधिक्षक ए.एम जोशी यांनी केले