
संतापजनक! नागपूरात अल्पवयीन मुलीवर सहा जणांचा दोन ठिकाणी सामूहिक बलात्कार
राज्यभरात खळबळ उडविणारी संतापजनक घटना नागपूरात उघडकीस आली .मदतीच्या बहाण्याने सहा जणांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून सीताबर्डी पोलिसांनी चार रिक्षाचालकांना अटक केली आहे.
सूत्रधार मोहम्मद शहानवाज ऊर्फ साना मोहम्मद रशीद (वय २५ रा.) मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसूफ (वय २६),मोहम्मद मुशीर (२३ तिन्ही रा. मोमीनपुरा) आणि त्यांचा एक साथीदार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पीडित १७ वर्षीय मुलगी दक्षिण नागपुरात राहाते. २९ जुलैला रात्री तिचा नातेवाइकांसोबत वाद झाला. त्यामुळे ती घरातून निघाली. मेडिकल चौकात एका रिक्षाचालकाला तिने मानस चौकात सोडायला लावले. चालकाने तिला मानस चौकात सोडले. साना हा रिक्षात बसला होता. त्याने मुलीकडे चौकशी केली. तणावात असल्याने तिने त्याला काहीही सांगितले नाही.
मदतीच्या बहाण्याने सानाने तिला ऑटोत बसवले. टिमकी परिसरातील एका घरी नेले. तेथे त्याचे अन्य तीन साथीदाराही आले. चौघांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. मध्यरात्री सानाने तिला मेयो हॉस्पिटल चौकात सोडले.तिथे आणखी एका रिक्षाचालकाला ती दिसली. त्याने साथीदाराच्या मदतीने रिक्षातच पीडित मुलीवर अत्याचार केला. मुलीला मेयो चौकात सोडून दोघे पसार झाले आहेत.