
महाराष्ट्र
शरद पवार – गडकरी यांची भेट ! चर्चेला उधाण
नागपूर : दिल्लीत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राजकीय भेटीगाठींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यानंतर त्यांनी भाजप नेते नितीन ओयांचीही भेट घेतली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याआधी त्या नितीन गडकरी यांना भेटल्या होत्या. या राजकीय गाठीभेटीने चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे.
मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे राजधानी दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आलंय. काय असेल यामागचं कारण आणि या राजकीय भेटींमध्ये नेमक्या कोणत्या मुद्दयांवर चर्चा झाल्या हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.