
पूर्व विदर्भ
8 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
8 लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज (30 जुलै) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हे दोघेही पती-पत्नी आहेत. या नक्षली दाम्पत्यांमध्ये विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा तसेच त्याची पत्नी कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची या दोघांचा समावेश आहे.
विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 1 आणि इतर 5 असे गुन्हे दाखल आहेत. तर पत्नी कविता हिच्यावर चकमकीचे 5, जाळपोळचा 1 आणि इतर 3 असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने विनोद बोगा याच्यावर 6 लाख रुपयाचे तर कविता कोवाची हिच्यावर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते