
महाराष्ट्र
लोकल सुरू करा अन्यथा ‘रेल भरो’ आंदोलन, मनसेचा सरकारला इशारा
ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. राज ठाकरे यांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती, नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे
गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसे रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.