नागपूर

नागपूर: शुक्रवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता.२९ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी ३० जुलै रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षा व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!