नागपूर

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे‘एनएडीटी’ सोहळ्यासाठी नागपूर येथे आगमन 

नागपूर दिनांक २८ एप्रिल ( महानगर प्रतिनिधी)

नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ( एनएडीटी ) येथे उद्या होणाऱ्या आय.आर. एस. अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण समारोप सोहळ्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आज सायंकाळी सात वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले.

२९ एप्रिल रोजी नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आय.आर.एस. तुकडीच्या ७४ वा प्रशिक्षण समारोप सोहळा होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू उदया सकाळी १०.२० वाजता नागपूर येथे पोहचत आहेत. ते राजभवनावर दुपारी थांबतीत. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते एनडीटीच्या कार्यकमात सहभागी होतील.

राज्यपालांच्या आगमनानंतर नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार,जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त लोहित मतानी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

००००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!