नागपूर

नागपूर म.न.पा. भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीवर सुनावणी ३० जुलै रोजी

नागपूर, ता. २८ : नागपुर महानगरपालिकेने दि. २५.०३.२०२१ रोजी झालेल्या स्थगित सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ६६ अन्वये निर्णय घेवुन सभागृह ठराव क्र. २९९ दि. २०.१०.२०१८ नुसार नागपुर महानगरपालिकेच्या मालकिच्या भाडेपट्टयावर दिलेल्या मालमत्तांकरीता भाडेपट्टा नुतनिकरण, भाडेपट्टा हस्तांतरण ना-हरकत, बांधकाम ना-हरकत, भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास करावयाच्या कार्यवाही संबंधी जे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे, त्या धोरणा अन्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाही संबंधी भाडेपट्टाधारकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेणेकरीता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. माजी महापौर संदीप जोशी या समितीचे अध्यक्ष आहेत. विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, वैशाली नारनवरे, नासुप्र विश्वस्त संजय बंगाले व महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे समितीचे सदस्य आहेत.

सदर समिती समोर भाडेपट्टाधारकांचे आक्षेप / तक्रार दाखल करण्यासाठी यापूर्वी १६ जूलै, २०२१ तारीख ‍ निश्चित केली होती. परंतु नागरिकांना आक्षेप दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही मुदत सात दिवस वाढविण्यात येत असून आता दिनांक २९ जुलै सायंकाळ पावेतो आक्षेप स्थावर विभागात दाखल करता येईल. प्राप्त झालेल्या आक्षेप / तक्रारींची सुनावणी ३० जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहांत संबंधित भाडेपट्टाधारकांचे म्हणणे ऐकुण घेणार आहे. तरी संबंधित भाडेपट्टाधारकांनी दि. २९.०७.२०२१ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत तक्रार अर्ज स्थावर विभाग महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स कार्यालयात सादर करावा व दि. ३०.०७.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता समिती समक्ष म्हणणे मांडणेबाबत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह, नागपुर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स येथे उपस्थित राहावे, असे उपायुक्त (मालमत्ता) विजय देशमुख यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!