
मी काय राज कुंद्रा आहे? राज ठाकरे यांचा मिशिकील सवाल आणि एकच हशा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत आज एक मिश्किल टिपण्णी केली आणि त्यानंतर एकच हशा पिकला.
राज ठाकरे पुण्यातील कार्यालयात दाखल झाल्यानंतर सगळे कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स हे राज ठाकरे यांचे फोटो, व्हीडिओ कटवेज घेण्यासाठी गर्दी केली. बराचवेळ फोटोग्राफर फोटो क्लिक करत होते. ते पाहून राज ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले की सगळं आलं का कान, नाक? किती वेळा तेच तेच? मी काय राज कुंद्रा आहे का? राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला आणि एकच हशा पिकला.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यात आजच राज कुंद्राला जामीनही नाकारण्यात आला आहे. राज कुंद्रा हा सध्या चर्चेत आहे.कारण पॉर्न फिल्म आणि पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रावर विविध आरोपही करण्यात आले आहेत. आता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज हाच संदर्भ घेत मी काय कुंद्रा आहे का असा प्रश्न विचारला त्यानंतर एकच हशा पिकला.