
नागपूर
हुडकेश्वर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण
नागपूर महानगरपालिकेच्या हुडकेश्वर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. हुडकेश्वर परिसर हा महापालिकेशी नव्याने जुळला आहे. येथे आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात केली. केंद्राला जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघता याच्या विस्तारीकरणाची गरज भासली म्हणूनच महापालिकेने दहा लाख खर्चातून विस्तारीकरण केले. येथे लॅबोरेटरी, मेडिकल स्टोअर रुम, व्हॅक्सीनेशन रुम आदी सुविधा उपलब्ध करण्यात आली. या विस्तारीकरणाचे कक्ष निरीक्षण आणि लोकापर्ण करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.