
नागपूर
सोयामिल्कचे संशोधक डॉ.शांतीलाल कोठारी यांचे निधन
नागपूर ( प्रतिनिधी) : सोयामिलकचे संशोधक,तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी आयुष्य वेचलेले, लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला यावी यासाठी तब्बल चाळीस वर्षे लढा दिलेले व आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे मंगळवारी निधन झाले.
अॅकेडमी आॅफ न्यूट्रीशन इम्प्रूव्हमेंट या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोठारी यांनी गेली चार दशके योग्य आहाराबाबत जनजागरणाचे काम अविरत केले. या कार्यात त्यांनी अनेकदा सरकारशी मोठे लढे दिले. त्यात लाखोळी डाळीवरील बंदी उठवण्याचा लढा त्यांनी चाळीस वर्षे दिला व ते त्यात यशस्वी झाले होते.