
महाराष्ट्र
तिकिटासाठी मनसेत प्रवेश करू नका : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधताना तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात मनसेत प्रवेश करू नका, असं राज ठाकरे यांनी सांगितलेे
राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या 15-20 दिवसात मी पुन्हा ठाण्यात येईल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.