
महाराष्ट्र
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अगोदरच पूरग्रस्त असलेल्या महाराष्ट्रापुढील अडचणीत वाढ होणार आहे. मध्य प्रदेशात उत्तर-पश्चिमेत बनलेला कमी दाबाचे क्षेत्र आता कमी झाले आहे. पण अजूनही या भागावर चक्रवात कायम आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर २९ जुलैला या भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत पावसाने थैमान घातले होते. यामुळे रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात नद्यांना पूर आला.