पश्चिम विदर्भ

वाशिमात दुध संकलन व वितरणास आता सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा

वाशिम, दि. २९  : राज्यात डेल्टा व डेल्टा पल्स व्हेरियंटचे कोरोना विषाणू आढळून आल्याने टप्पा क्र. ३ अंतर्गत निर्बंध लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २८ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन नियमावली करण्यात आली आहे.

या नियमावलीमध्ये अंशतः बदल करून दुध संकलन व वितरणाच्या कालवधीत बदल करून आता दुध संकलन व वितरणास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी २६ जून रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत केवळ घरपोच दुध वितरणास मुभा देण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!