ग्रामीण

रामटेक: दुचाकीचा भीषण अपघात,तरुणीचा मृत्यु,तरुण गंभीर

रामटेक महामार्गावर  रामटेक कडे येत असतांना मोटारसायकलने ट्रकला ओव्हरटेक करीत असतांना भीषण अपघात झाला. यामध्ये तरुणीचा जागेवरच मृत्यु झाला तर तरुण गंभीर जखमी झाला.

सदर घटना मनसर येथील श्रीकृष्ण मंदीर च्या समोर घडली. ट्रक क्र. एम.एच. ४०/ बी.जी. ९६१५ ला वेगाने जात असलेल्या पल्सर मोटार सायकल नं. एम.एच. ४९/ डि.जी. ८५५५ ने वेगाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता पल्सर मोटारसायकल अनियंत्रीत झाल्याने मागे बसलेली स्नेहा अजय मेश्राम (१५) इंदीरा नगर, जरीपटका नागपुर ही घसरून ट्रक च्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. तर दुसरीकडे मोटारसायकल अनियंत्रीत होवुन पडल्याने आकाश इश्वर सहारे (१९) कस्तुरबा नगर नागपुर हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे उपचार सुरु आहे. पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तरुण व तरुणी हे रामटेक फिरायला आले होते. परंतु ओव्हरटेकच्या प्रयत्नात अल्पवयीन तरुणीचा मृत्यु झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!