
पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, इंजिनिअर तरुणाचा मृत्यू
पुसद, 25 जुलै : विदर्भातील गुन्हेगार आता बंदुकीचा वापर सर्रास करताना दिसत आहे . दिवसाढवळ्या गोळीबार करण्याचे प्रकरण वाढतच असून अशीच एक घटना आज यवतमाळच्या पुसद मध्ये घडली. यवतमाळ ( yavatmal) जिल्ह्यातील पुसद (Pusad ) येथे भरदिवसा गोळीबाराची (Firing) घटना घडली आहे. एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तीनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुसद-वाशिम रोडवर ही घटना घडली आहे. इम्तियाज खान ( वय 32) असं मृत तरुणाचं नाव आहे. इम्तियाज खान (Imtiaz Khan) काही कामानिमित्ताने आला होता. नेमकं त्याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खानवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागली. त्यामुळे तो जागेवरच कोसळला. गोळीबार केल्यानंतर दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.इम्तियाजला हॉस्पिटलला नेले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले
इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचा एस आरएसी मोटर वर्क अँड ऑटो गॅरेज आहे. गोळीबार कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलिस करीत आहे