
नागपूर
नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, नाना पटोलींची मोठी कारवाई
जिल्हा परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू उर्फ उदयसिंग यादव (Gajju aka Udaysingh Yadav) यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वाद झाला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची काँग्रेस कमिटीकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका गज्जू यादव यांच्यावर ठेवण्यात आला.
गज्जू यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव होते. मात्र पक्षशिस्त मोडून गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यादव यांचे पक्षातून निलंबन करण्याचे आदेश दिले.