
रिसोड येथे भरदिवसा चोरी,चांदीचे भांडे गेले चोरीला
वाशिम : कोरोना संक्रमणमध्ये लागलेल्या लॉकडाउन मध्ये थोडी सूट मिळताच चोरीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहे, अशीच एक घटना आज भरदिवसा रिसोड येथे घडली. भरदिवसा एका बंद घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटात असलेले चांदीचे भांडे चोरून नेल्याची घटना आज दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील अनंत कॉलनीत घडली असून चोरीला गेलेल्या एक किलो चादिंच्या भांड्याची किंमत 70 हजार रुपये अंदाजे किंमत असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील प्रमोद प्रभाकर झडपे हे आपली स्वस्त धान्य दुकान चालवत असून आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान आपल्या दुकानावर गेले असता दुपारी बारा वाजता परत आले असता त्यांच्या घराचा कडी कोंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळला. आत बघितले असता त्यांच्या घरातील तीन रूम मधील तीन कपाट उघडले अवस्थेत आढळले. त्यातील एका कपाटातील चांदीचे भांडे चोरी गेल्या असल्याचे समजले. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असून यावर आळा घालण्याची मागणी जनतेतून केली जात आहे