
नागपूर
नागपूर : शनिवारी मनपा केन्द्रांमध्ये मर्यादित लसीकरण
नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेकडे कोव्हीशिल्ड लसीचासाठा कमी प्रमाणात शिल्लक असल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शनिवारी (२४ जुलै) रोजी ४५ वर्षावरील सर्व वयोगटातील नागरिकांचे मर्यादित स्वरुपात लसीकरण होणार आहे, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.