ग्रामीण

कळमेश्वर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस,नदी नाले झाले तुडुंब

कळमेश्वर (प्रतिनिधी ) : कळमेश्वर तालुक्यातील गेल्या दोन दिवसापासून सतत पाण्याला प्रारंभ झालेला असून मुसळधार पाऊस पडत आहे लोकांना घराच्या बाहेर जाणे कठीण झालेले आहे तसेच आज दिनांक गुरुवार ला सकाळी नऊ वाजता पासून पावसाला सुरुवात झाली असून धो-धो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तसेच अति दृष्टी सुद्धा झालेली आहे यामध्ये कळमेश्वर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरलेले आहेत आतापर्यंत झालेल्या झालेल्या पावसाची नोंद 404 मिलिमीटर झाल्याचे कळमेश्वर चे नायब तहसीलदार भुजाडे यांनी सांगितले

या पावसामुळे नागपूर काटोल कळमेश्वर मधील खडक नाल्याला फार मोठा पूर आल्याने काटोल जाणारी वाहतूक वाहतूक कोंडी झाल्यामुळे एमआयडीसी मार्गे बायपास ने वढविण्यात आली आहे आली आहेत तसेच कळमेश्वर गोरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने शेतकरी शेतमजूर नाल्याच्या काठावर अडकून पडलेले आहे

कळमेश्वर शहरातून वाहणारे पाणी लगतच्या वस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे काही दिवसापूर्वी पुरातून वाहून गेलेल्या दोन इसमाची घटना ताजी असल्यामुळे नगर प्रशासन महसूल विभाग पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून नाल्याकाठी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच तालुक्यातील शेती जलमय झालेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!