
पुर परिस्थितीबाबत पाहणी करण्याकरिता बच्चू कडू यांचा आज अकोला दौरा
अकोला,दि.23 – राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शुक्रवार दि. 23 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोलाकडे प्रयाण व सकाळी 10 वा. 5 मि. नी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जिल्ह्यात उद्धभवलेली पुर परिस्थितीबाबत आढावा बैठक, सकाळी 11 वा. 5 मि.नी अकोला शहर, कौलखेड, खडकी व चांदुर ता.जि. अकोला येथील पुर परिस्थितीबाबत पाहणी. दुपारी 12 वा. 5 मि.नी बार्शिटाकळी तालुक्यातील पुर परिस्थितीबाबत पाहणी व सवडीने कुरळपुर्णा मार्गे, जि. अमरावती कडे प्रयाण.