पूर्व विदर्भ

वर्धेत नौकरी करणा-या महिलासाठी वसतीगृह योजना 

वर्धा :नोकरी करणा-या महिलांसाठी सुरक्षित आणि सोईस्कर ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी केद्र शासनाचे वतीने नोकरी करणा-या महिलांसाठी वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. वसतीगृहात अविवाहित , विधवा, घटस्फोटीत, विभक्त, विवाहित परंतु ज्यांचे पती किंवा जवळचे कुंटुब त्याच शहरात राहत नाही अशा नोकरी करणारी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल मेसरे यांनी केले आहे.

ज्या महिलेचे एकुण उत्पन्न 35 हजार पेक्षा जास्त नसेल अशी महिला तिच्या मुलासह वसतीगृहात राहू शकेल. तसेच नोकरी करणा-या महिलेसोबत 18 वर्षापर्यंतची मूलगी व 5 वर्षापर्यंतचा मुलगा राहू शकणार आहे. वसतीगृहात प्रवेश दिलेल्या नोकरी करणा-या व नोकरीसाठी प्रशिक्षण घेणा-या महिलेकडून सिंगल बेडरुमसाठी एकुण मासिक पगाराच्या 15 टक्के, डबल बेडरुमसाठी 10 टक्के व डॉरमेट्रीसाठी 7.5 टक्के पेक्षा जास्त दर घेतला जाणार नाही.

वर्धा जिल्हयात नोकरी करणा-या महिलांसाठी कस्तुरबा हेल्थ सोसायटी व्दार संचालित सेवाग्राम येथे व मातृ सेवा संघ व्दारा संचालित रामनगर येथे वसतीगृह आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा असे, महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!