
दोन लाईट एक पंख्याचे एक महिन्याचे वीज बिल आले १८ हजार
मौदा(प्रतिनिधी): मोलमजुरी करणाऱ्या आणि कौवेलुच्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबाला दोन लाईट आणि 1पंख्याचे एक महिन्याचे वीज बिल 18000 रुपये आले आहे
तालुक्यातील मारोडी येथील मारोती मस्के यांचे गावात वडिलोपार्जित कौवेलु घर आहे सदर कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असते याच त्यांचे रहाते घरी दोन लाईट आणि एक पंखा एवढेच विद्दुत उपकरण वापरत असताना सुद्धा त्यांच्यावर एक महिन्याचे वीज बिल 18 हजार रुपये आलेले आहे आलेले वीज बिल कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी मौदा बोरगाव येथील विद्दुत कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या परंतु त्यांचे वीज बिल कमी झाले नाही आपण नियमित बिल भरत असताना सुध्दा एवढ्या मोठ्या रकमेचे बिल का देण्यात आले असा प्रश्नन कुटुंबातील सदस्यांना पडला आहे
विद्दुत विभागातर्फे गाव खेड्यातील घरघुती मीटर चे रिडींग योग्य प्रकारे आणि दर महिन्याला घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अंदाजे मीटर रिडींग नुसार वीज बिल पाठविले जात असल्याचा आरोप मारोडी ग्रामपंचायत चे सरपंच नीलकंठ भोयर यांनी केला आहे
वीज बिल थकीत झाल्यामुळे विद्युत विभागाकडून शेतकऱ्याच्या शेतातील वीज कनेक्शन कापल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देता येत नाही तर दुसरीकडे याच विद्दुत विभागाकडून वीज ग्राहकांना भरमसाठ बिल येत असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे मौदा विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे सामान्य विद्दुत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे