
पश्चिम विदर्भ
बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्दचे दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यु
यवतमाळ( प्रतिनिधी): जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्याअंतर्गतच्या नांदुरा खुर्दचे दोन मुले, शेतातील तळयात बुडून मृत्यु पावले. नांदुरा खुर्दचे दोन मुले शेतातील तळयात उतरले पाण्याची खोली लक्षात न आल्याने हे दोघेही खोल पाण्यात बुडून मरण पावले.
आकाश राजू दुधकोर वय 15 वर्ष व दुसरा चेतन सुरेश मसराम वय 15 वर्ष हे दोघेही नांदुरा खुर्द ते कोठा मार्गावरील ज्ञानेश्वर नागोसे यांच्या शेतातील तळयात उतरले. दरम्यान ते खोल पाण्यात बुडून ठार झाले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजतादरम्यान घडली. या घटनेची माहिती बाभुळगाव पोलीस स्टेशन ला देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा करून, प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी दुपारी दो न्ही मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.