
महाराष्ट्र
राहुल गांधी यांचा लवकरच महाराष्ट्र दौरा, नागपूरसह मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली करणार
आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीतल्या निवासस्थानी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली.
महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल यासाठी काम करण्याचे आदेश आपल्याला मिळाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तीन वर्षांवर आहेत याबाबतचा निर्णय हाय कमांड घेईल, पण आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढेल अशी माहिती या भेटीनंतर नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली करणार असल्याची माहिती एच के पाटील यांनी दिली.