
वर्धा: कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त ,21 जुलै ला 55 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण
21 जुलै ला 55 लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण
वर्धा, दि 20 :- जिल्ह्यात आतापर्यंत 4 लक्ष 43 हजार 744 नागरिकांना कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त लसीचे डोसच्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून दुसरा डोस घेणा-यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त झाले असून 21 जुलै ला 55 केंद्रावर 18 वर्षापुढील सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू राहील. तसेच कोव्हक्सीन लसीचे डोस एका केंद्रावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
18 वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला डोस तसेच 45 वयापेक्षा जास्त नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 89 लसीकरण केंद्रावर उपलब्ध राहील. तसेच कोव्हक्सीन लसीचे डोस पोलीस रुग्णालय या एका केंद्रावर उपलब्ध आहे.