महाराष्ट्र

यावर्षी भेंडवळच्या घटमांडणीत पीक, पाऊस सह अनेक भविष्यवाणी: जाणून घ्या काय आहे भविष्यवाणी

राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी (Bhendwal Prediction) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी  झालीय.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान, देशासह राज्यातली भविष्यातील राजकीय परिस्थिती याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.त्यानुसार यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे तसंच घुसखोरीबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी भेंडवळच्या घटमांडणीत खालील भाकीत करण्यात आली 

पाऊस –जून महिन्यात पाऊस कमी असेल. जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल.

अवकाळी पावसाचा प्रभाव या वेळेस कमी असणार आहे मात्र जनतेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असले.

पीक – ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील. पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.

नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

देशाचा राजा कायम – देशाचा राजा कायम असेल. मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल. परकीयांची घुसखोरी वाढेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!