
नागपूर
बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करा: जिल्हा प्रशासन
21 जुलै रोजी बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा सण येत आहे. तथापि यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राज्यात लागू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांनी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या वर्षीची बकरी ईद अगदी साधेपणाने साजरी करावी. तसेच शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या काळात सण-उत्सव यामुळे तिसरी लाट येऊ नये, याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, अशी सूचना देखील करण्यात आली आहे.