पश्चिम विदर्भपूर्व विदर्भ

विदर्भातील एकमेव पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान

विदर्भातील मानाच्या पालखीचं प्रस्थान

प्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीच माहेर अमरावतीच्या कौडण्यपूरला म्हंटलं जातं.आषाढी एकादशीला दरवर्षी रुख्मिणीच्या पादुका घेऊन वारकरी सासरी जातात. 1594 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोना च्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झालीय. पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिलीय आणि त्यात दहा पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरची पालखी आहे.

427 व्या वर्षात पदार्पण

या वर्षी ही पालखी 427 व्या वर्षात प्रदार्पण करीत असताना कोरोनाच्या सावटामध्ये ही पालखी आज 80 वारकऱ्यांसह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षी पायी जाणारी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या पालखीला यावर्षी मात्र एसटी महामंडळाच्या बसने माता रुक्मिणीच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!