
राज ठाकरेंसोबत केली राजकीय चर्चा : चंद्रकांत पाटील
राज ठाकरेंसोबत आज जी भेट झाली त्यात काही फक्त हवा पाण्यांची चर्चा झाली नाही तर, राजकिय चर्चा झाली. त्यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला जातो. अस राज ठाकरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी स्वत: त्यांची चाळीस पन्नास भाषणे ऐकणार आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे तर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज करीत असल्यापासून म्हणजे आम्ही परस्परांना ४० वर्षापासून ओळखतो. त्यांची वोट बँक मोठी आहे. चेहरा आश्वासक आहे, पण परप्रांतीयांविषयीच्या त्यांची भूमिका बदलली पाहिजे. असे भाजपच मत आहे. तर स्वत: ठाकरे यांच्या परप्रांतीयांच्या भूमिकेविषयी चुकीच्या पध्दतीने मांडणी होते. असे त्याचे म्हणणे आहे म्हणून मी स्वत: आता त्यांची चाळीस ते पन्नास भाषणे ऐकणार आहे.