
नागपूर
गावकऱ्यांकडून ईडीच्या पथकाचं विरोध, घोषणा
काटोल आणि वडविरा येथील गावकऱ्यांनी अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकायला आलेल्या पथकाचं जोरदार विरोध केला असून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली एडीचलेजाव मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी गावकऱ्यांनी दिल्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडवीरा येथील घरी छापा टाकला आहे , दोन वेगवेगळ्या पथकांकडून एकाच वेळी आज सकाळी 8 वाजेपासून हे छापे टाकण्यात आले असून घरांची झाडाझडती सुरू आहे
यापूर्वीही ईडीने त्यांच्या नागपूर आणि मुंबई या घरांवर आणि कार्यालयांवर छापा टाकला होता आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते