
महाराष्ट्र
स्त्रियांनो कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवा:मुख्यमंत्री ठाकरे
महिलांनो कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे,तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे. महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) सदैव तुमच्या पाठीशी राहतील. असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असल्याचं देखील मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. त्यावेळी ते साताऱ्यातील अलंकार हॉलमध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या (Women Safety Project) ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.
महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही, असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले