महाराष्ट्र

राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट,चर्चेला उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे भेट घेतली असून दोघांत युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे या भेटीत नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई महापालिकेतल्या युतीबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीतून राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चर्चा आहे.

राज ठाकरे आणि  चंद्रकांत पाटील हे दोघेही सध्या नाशिकमध्ये आपल्या दौऱ्यासाठी गेले आहेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा असून ते नाशिकमधल्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही याच विश्रामगृहात आहेत.

पाटील यांनी कालच मनसेशी युती करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जीवावर सत्ता येणार नाही. आमचा जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.देवेंद्र फडणवीस यांनीही मनसे सोबत युतीबाबत योग्यवेळी निर्णय घेवू असे सांगत युतीचे संकेत दिले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!