नागपूर

नागपूरच्या कलावंतांनी सजलेला आम्ही बटरफ्लाय चित्रपटाचे पोस्टर ट्रेलर व गाणी 26 जूनला नागपुरात होणार रिलीज

नागपूर दिनांक 25 जून ( महानगर प्रतिनिधी)

२६ जून ला संध्याकाळी 5  वाजता नितीन गडकरी केंद्रीय मंत्री , चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री व आमदार ,आमदार टेकचंद सावरकर,  आमदार विकास ठाकरे, जिल्हाधिकारी आर. विमला ,श्रीमती खोडे मुख्याधिकारी  जि. प. नागपूर तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील  अभिनेता गिरीष परदेशी व अभिनेत्री आकांक्षा गाडे हयांच्या उपस्थितीत “आम्ही बटरफ्लाय या मराठी चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर व गाणे रिलीज  होणार आहे.

“आम्ही बटरफ्लाय” हा चित्रपट आपल्या नागपूर विदर्भातील बाल-कलाकारांना घेऊन निर्माण केलेला ह्या चित्रपटाचे  दिग्दर्शन अनिकेत लिमजे व श्रीनिवास शिरास यांनी केले आहे.

विदर्भातील बाल कलाकारांचे कला गुणांना वाव मिळावा म्हणून “राज किएशन्स मिडीया” च्या वतीने (राजेश रंगारी निर्मीत) “यांनी आम्ही बटरफ्लाय चित्रपट निर्मीत केला आहे.

विशेष म्हणजे “बालसदन आश्रम” अनाथ मुलांच्या आश्रमात राहून व जिल्हा परिषद शाळेत शिकणारा साहील केणे हा चित्रपटाचा केंद्र बिंदू आहे. प्रशांत हाडके यांच्या मार्गदर्शनात तो पुढची वाटचाल करीत आहे.

या चित्रपटात नागपुरातील पूर्वा मानकर, उर्वेश पोटफोडे, अर्णव देशपांडे यांनी  अभिनय केला आहे. एकंदरीत मुलांसाठी मुलांनी मांडलेला सिनेमा आपल्या भेटीस चित्रपट “झुंड” च्या नंतर नागपुरातील कलाकाराला “आम्ही बटरफ्लाय” या चित्रपटाच्या माध्यमातून  “ऑगस्ट” मध्ये रिलीज होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!