
यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी ,पहा महाराष्ट्राचा विभागवार निकाल!
दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालाची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपलं निकाल पत्र हाती मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना यंदा दहावीचे गुण देण्यात आले आहेत.
राज्याचा निकाल 99.95 टक्के
नऊ विभागीय मंडळाने घेतली परीक्षा
सर्वात जास्त निकाल 100 टक्के कोकण
सर्वात कमी निकाल 99.84 टक्के नागपूर
औरंगाबाद 99.96 टक्के
मुंबई 99.96 टक्के टक्के
कोल्हापूर 99.92 टक्के
अमरावती 99.98 टक्के
नाशिक 99.96 टक्के
लातूर 99.96 टक्के
एकूण 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थी संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे, त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.