
आषाढ़ी एकादशी: मुख्यमंत्री ठाकरे पंढरपूरला मुक्काम करणार
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जुलैच्या रात्री पंढरपुरात मुक्कामी येणार आहेत. 20 जुलैच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा होणार आहे. याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 19 जुलैला पंढरीत मुक्काम
आषाढी एकादशी सोहळ्याची विठुरायाची शासकीय पूजा परंपरेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी गुरूवारी मुंबई येथील मातोश्री येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येण्याचे खास आमंत्रण दिले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 जुलैच्या रात्री पंढरीत मुक्कामी येणार असल्याची माहिती दिली. 20 जुलैच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय पूजा करतील, अशी माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.