
१३ राज्यांतील सर्वेक्षणात उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
तेरा राज्यात झालेल्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बाजी मारली आहे या सर्वेक्षणात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत.
प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले आहे ,या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट झाले. ‘उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू’ असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत. त्यांच्या कामगिरीला ४४ टक्के सकारात्मक मते मिळाली आहेत. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी असून ४० टक्के मते गेहलोत यांच्या पारड्यात पडली आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी राहिले आहेत.
या मुद्द्यांवर केले होते सर्वेक्षण
१. कामगिरी खराब आहे आणि मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नको.
२. कामगिरी ठिक आहे पण पुन्हा मत देणार नाही.
३. कामगिरी चांगली आहे आणि पुन्हा हाच मुख्यमंत्री व्हावा.
४. तटस्थ