
महाराष्ट्र
डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती :गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती (Maharashtra Police Recruitment) केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबर 2021 पूर्वी 5200 पदांची भरती (Maharashtra Police Recruitment) करण्यात येणार असून त्यानंतर 7 हजार पदे भरली जाणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी आज केली.
पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा,त्यादृष्टीने योजना बनवण्यात येत आहे.तसेच कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचे गृहमंत्री म्हणाले.