
नागपूरात पार्कींग जागा व पार्कींग पॉलिसी संदर्भात झोननिहाय आढावा
नागपूर शहरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची तसेच पार्कींगची कोंडी होत आहे. माननीय उच्च न्यायालयाने वाहतुकीची कोंडी संपुष्टात आणण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिकेला दिले आहेत.
नागपूर मनपाची शहराकरीता पार्कींग पॉलिसी तयार असून मुख्य रस्त्यावर पार्कींगचे व्यवस्थापन करण्यासाठी अर्बन मास ट्रांजिट सिस्टम (यू.एम.टी.सी.) ची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरात प्रत्येक झोनमध्ये पार्कींगच्या निश्चित जागांची व पॉलिसीबद्दल माहिती देण्याबाबत मनपा महासभेमध्ये निर्देश देण्यात आले आहेत. महासभेच्या निर्देशानुसार झोननिहाय पार्कींगच्या जागा आणि पार्कींग पॉलिसीसंदर्भात आढावा घेण्यास सुरूवात झाली. सोमवारी (१२ जुलै) लक्ष्मीनगर झोन आणि धरमपेठ झोनमध्ये यासंदर्भात यूएमटीसी द्वारे सादरीकरण करण्यात आले.
मे. यू.एम.टी.सी या कंपनीतर्फे मुख्य रस्त्याचे सर्वेक्षण करुन पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात एकूण ५६ रस्त्यांचा समावेश असून चारचाकी वाहनांकरीता २,८७४ जागा व दुचाकी वाहनाकरीता १३,६१० जागा उपलब्ध आहेत. सर्वेक्षणात ९० टक्के वाहने दोन तासापेक्षा कमी कालावधीसाठी पार्किंग करण्यात येतात. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या मंजूर दरानुसार अंदाजे दर दिवशी ५.५८ लक्ष उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील एकूण ५६ रोडवर १५,६१२ चारचाकी तसेच ७५,७४१ दुचाकी वाहनांचे पार्किंग दरदिवशी करणे अपेक्षित आहे. डी.पी.आर. मंजुरीनंतर निविदा बोलावून प्रायोगिक तत्वावर टप्याटप्याने हा प्रकल्प राबविण्यात येईल. सदर प्रकल्पामुळे महानगरपालिकेस उत्पन्नाचे साधन मिळेल, वाहतुकीची कोंडी कमी करण्यात मदत मिळेल व मा.उच्च न्यायालय यांचे आदेशाचे पालन सुध्दा होईल.
लक्ष्मीनगर झोनमधील बैठकीत स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, माजी महापौर नंदा जिचकार, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लहुकुमार बेहते, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, लखन येरावार, किशोर वानखेडे, नगरसेविका सोनाली कडू, सहायक आयुक्त गणेश राठोड, राजेंद्र राठोड, आनंद लामसोंगे, अनिल मुटे, स्वाती चिंचखेडे, निखील सोनटक्के, अनंत रेवस्कर, आर.एम.तिडके, एन.एस.बोबडे, विजय गुरुबक्षानी आदी उपस्थित होते.
धरमपेठ झोनमधील बैठकीत धरमपेठ झोन सभापती सुनिल हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका डॉ.परिणिता फुके, शिल्पा धोटे, प्रगती पाटील, रुपा राय, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, उपअभियंता वाईकर, झोन अभियंता टेंभेकर, कनिष्ठ अभियंता राकेश झाडे, मनपा वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
यूएमटीसी कंपनीतर्फे सहायक व्यवस्थापक अमित भंडारी आणि वरीष्ठ अभियंता (सिव्हिल) उदय जैस्वाल यांनी सादरीकरण केले. ऑनलाईनरित्या ॲडव्हायझर रामकृष्ण यांनी