
पश्चिम विदर्भ
वाशिम जिल्ह्यातील निर्बंध पुढील आदेशपर्यंत कायम
वाशिम, दि. ११ : राज्यात कोरोना विषाणूचे डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आल्याने जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार नवीन नियमावली लागू करण्यात आली होती. सदर आदेशातील दिशानिर्देश आता पुढील आदेशपर्यंत कायम राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ११ जुलै रोजी जारी केले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.