महाराष्ट्र

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही- शरद पवार

महाविकास आघाडीत पाठीत सुरा खुपसला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला आहे. नाना पटोले यांच्यासारखी माणसं लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं ते म्हणाले आहेत. ncp sharad pawar comment on congress nana patole

या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, असं म्हणत शरद पवार यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत आहे. पण, त्यांनी लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना, ते सोबत राहून पाठीत सुरा खुपसताहेत असं गंभीर वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचं दिसून आलंय.

लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुढील पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं नाना म्हणाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!