नागपूर

श्रीराम सेनेची मान्यता रद्द

संघटनेच्या नावाने पैसे मागितल्यास पोलिसात तक्रार दाखल करा

980 सभासद संख्या असलेली श्रीराम सेना या संघटनेची मान्यता धर्मदाय आयुक्त यांनी रद्द केली आहे, नागपुरात एका हत्येच्या प्रकरणाची सुपारी श्रीराम सेनेच्या अध्यक्षांनी घेतली असे सिद्ध झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक करीत त्याने श्रीराम सेनेच्या नावाने पसरविलेल्या साम्राज्यातून निर्माण केलेली दहशत उध्दवस्त करून टाकली आहे.

श्रीराम सेना संघटनेच्या नावाने खंडणी, नागरिकांच्या प्रॉपर्टीवर अवैध कब्जा करणे असे विविध गैर कायदेशीर कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे, धर्मदाय आयुक्त यांचेकडे संघटनेची नोंदणी झाल्यावर त्याचे उद्दिष्ट व या संघटनेचे कार्य याचा कधी मेल झाला नाही.

मोक्का अंतर्गत अटक झाल्यावर रणजित सफेलकर तुरुंगाची हवा खात आहे, विदर्भात या संघटनेने मोठं जाळं पसरविले आहे, चंद्रपुरात सुद्धा या संघटनेचे अध्यक्ष वाळू माफियांकडून खंडणी प्रकरणी अटकेत होते.

श्रीराम सेना कार्यक्रमाच्या नावाखाली अनेकदा नागरिकांकडून जबरदस्तीने धमकावीत पैसे उकळत होती.

नागपूर गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी नागरिकांना आवाहन केले की या संघटनेच्या नावाने कुणीही आपल्याला त्रास देत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, पोलीस अश्या गुन्हेगारी वृत्तीवर कठोर कारवाई करेलचं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!