
महाराष्ट्र
निर्बंध पूर्णत: शिथिल करा किंवा कडक लॉकडाऊन करा; आरोग्यमंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अजूनही काही जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात निर्बंध जाहीर करावेत. मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे तिथे नागरिकांना उद्योग व्यापारासाठी पूर्ण परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असंही टोपे यांनी सांगितले.
‘करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध एक तर पूर्णतः काढून दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.