
आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी नवीन कामठी पोलिसांच्या जाळ्यात
चौघास अटक ,4 लाख 78 हजाराचा मुद्देमाल जप्त
कामठी: एटीएम फोडून दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळीला नवीन कामठी पोलिसांनी अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दिपेन्द्र प्रताप ईश्वरदिन वय 20 ,आशुतोष वेदप्रकाश कालपी दोघेही राहणार देवकली मैनपुर जिल्हा जालोंन उत्तर प्रदेश, गौतम राजाराम वय 26 राहणार दौतपूर जिल्हा कानपूर उत्तर प्रदेश , दिपू मुन्नालाल यादव वय 23 राहणार शेवडी जिल्हा मोहबा उत्तर प्रदेश यांनी बोलेरो गाडी क्रमांक युपी 77 पी 0864 मध्ये मोठी हातोडी ,दोन कटर ,दोन मोठे पेचकस ,लोखंडी हेक्सा ,भरून एटीएम फोडून दरोडा टाकण्यासाठी जात असताना नवीन कामठी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक गस्तीवर असताना बोलेरो गाडी थांबवून आरोपीस विचारपूस केली असता त्यांनी बंगलोर, हैदराबाद येथे जात असल्याचे सांगून बनवा बनवीचे उत्तर देऊ लागले
पोलिसांनी सर्व आरोपी नवीन कामठी पोलीस स्टेशनला गाडी आणून गाडीची तपासणी केली असता दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले आरोपी जवळून वेगवेगळ्या बँकेचे 60 एटीएम कार्ड ,दोन मोबाईल फोन व गाडीची किंमत एकूण चार लाख 78 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 399 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश डी आर भोलार यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे
आरोपी जवळून अजून काही दरोड्याचे प्रकरण उघडकीस येणार असून या टोळीच्या काही सदस्यांना अटक करण्यात येणार असल्याचे नवीन कामठीचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले आहे वरील कारवाई पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार विजय मालचे ,दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे ,पोलीस उपनिरीक्षक विजय कार्वेकर ,बीट मार्शल रवी बड ,अलोक रावत ,राष्ट्रपाल दुपारे, उमेश पडोळे ,अविनाश चागोले यांच्या पथकाने केली