पूर्व विदर्भ

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन वर्धा जिल्हा अपघातमुक्त करावा – खासदार रामदास तडस

वर्धा जिल्हयात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातुन अनेक मोठे प्रकल्प प्रगतीपथावर आहे. वर्धा-आर्वी , आर्वी –तळेगाव, वर्धा हिंगणघाट हॅव्रीट ॲनेवीटी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामे सुरु आहे. या कामामध्ये रस्ता सुरक्षा विषयक बाबीची पुर्तता करण्यात येते किंवा नाही याचे मुल्यांकन करुन अहवाल सादर करुन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वर्धा जिल्हा अपघातमुक्त करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी दिल्यात.

केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार गठण झालेल्या संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकिला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, आर्वी कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे, राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर राजन पाला, अमरावतीचे एम.एच.राठोड,यवतमाळचे चंदनसिंह बायस, अशोक वनकर, वसंत नाल्हे, अंकुश केने, औरंगाबादचे बी.एस.कसबे, वाहतुक पोलिस निरिक्षक राजेश कडू, महामार्ग जामचे वाहतुक पोलिस निरिक्षक, अशासकिय सदस्य किरण उरकांदे, प्रणव जोशी, शिरिष भांगे आदी उपस्थित होते.

संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या अधिसुचनेतील तरतुदीनुसार वर्धा जिल्हयात स्वतंत्र वाहतुक पार्कची निर्मिती करावी, युवकांमध्ये अपघात टाळण्याकरीता जनजागृती करावी व नव्याने घोषित करण्यात आलेल्या जालना ते पुलगाव महामार्गाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आडिट करुन उपाययोजना कराव्या याबाबत तडस यांनी सुचना केल्या केल्या. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहिर सभेत घोषित केलेल्या हिंगणघाट शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर (जुना) उडान पुल बांधण्याकरीता समितीमध्ये एक मताने ठराव करुन कलोडे चौक व अशोक हॉस्पीटल चौक या स्थळाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपूर यांचे ठराव पाठविण्यात आले व सोबतच जिल्हयातील 32 ब्लॅक स्पॉट दुरस्तीबाबत एक मताने निर्णय घेण्यात आला.

रस्ते अपघात टाळण्याकरीता सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करुन रस्ते सुरक्षा उपाययोजनाचे तंतोतंत पालन करावे याबाबत व विशेष करुन पावसाच्या दिवसात विशेष काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी अधिकारी वर्गांना दिल्यात.

यावेळी अशासकिय सदस्य किरण उरकांदे व प्रणय जोशी यांनी सुध्दा रस्ता सुरक्षाबात आपल्या समस्या मांडल्या.

बैठकिला शिक्षण विभागाचे सुनिल कोहळे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नितीन निमोदिया यांची उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!