
अकोल्यात भीषण अपघात,वाशिमचे 4 ठार
शेगांववरून दर्शन करून परतणाऱ्या अकोला (Akola) नजीक असलेल्या रिधोरा येथे राष्ट्रीय महामार्ग (National Highway Accident) क्रमांक सहावर झालेल्या भीषण अपघातात (Akola National Highway Accident) चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रिधोरा (Ridhora) येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात असलेले ट्रक आणि कार यांची धडक होऊन हा अपघात घडला. घटनास्थळावर कारचा अक्षरशः चुराडा झाल्याचे पाहायला मिळते आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याचे समजते.
घटनेबाबत माहिती अशी की, एमएच 37 G 8262 क्रमांकाची एक कार शेगावकडून वाशिमच्या दिशेने जात होती. कार रिधोरा नजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली. याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने कारला जोरदार टक्कर दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
अपघात एवढा भीषण होता की कारचा चुराडा झाला होता. तर कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. एकामध्ये काहीशी जाणीव दिसत होती. त्याला अकोला सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाळापूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, तपास सुरु केला आहे